Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi | प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये
Motivational Quotes In Marathi

1. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
2. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे
3. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु. काळे
4. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या
5. हिंमत एव्हढी ठेवा की, तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल
6. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की
7. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते
8. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम
9. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी
10. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते
Inspirational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी

Inspirational Quotes In Marathi
आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक प्रसिद्ध लेखक होऊन गेले आहेत. त्यांचे प्रेरणादायी विचार (Inspirational Quotes In Marathi), तसेच प्रेरणादायी कविता आपल्याला नेहमीच प्रभावित करतात. जसं व. पु. काळे यांचे प्रेरणादायी विचार, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि पु. लं. देशपांडे यांचे विचार जे आजच्या तरूण पिढीसाठीही उपयुक्त आहेत. पाहूया त्यांचे प्रेरणादायी विचार मराठी.
1. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते
2. मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत
3. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं यालातरी नक्कीच महत्त्व आहे
4. खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते
5. आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.
6. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले
7. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
8. केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही व्यवसाय आहे, चामडं शिवणं हा चांभाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून व्यवसायच आहे.
9. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे
10. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.
11. जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळयातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!
12. चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?
13. जगात काय बोलत आहात, यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे
परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे
14. भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो
15. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
Positive Motivational Quotes In Marathi | सकारात्मक प्रेरणादायी कोट्स मराठीमध्ये
आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. प्रत्येकाला त्या क्षणी सकारात्मक मनस्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे असते आणि त्यासाठी आपल्याकडे मराठीमध्ये असे अनेक सकारात्मक प्रेरणादायी कोट्स आहेत (Positive Motivational Quotes In Marathi). तर अनेक मराठी सुविचार आयुष्यासाठी महत्त्वाचे ठरतात.
1. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
2. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.
3. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.
4. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
5. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात
6. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा.
7. आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या.
8. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो, ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे.
9. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका. कारण हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात.
10. इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.
Success Quotes In Marathi | सक्सेस कोट्स इन मराठी
2. डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही – बिल गेट्स.
3. कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की, ते काम आवडीने करा – स्टीव्ह जॉब्स
4. जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात – शिव खेरा.
5. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त – पंडीत जवाहरलाल नेहरू.
6. नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो – अब्राहम लिंकन.
7. कार्य हाच यशाचा पाया आहे – पाब्लो पिकासो.
8. वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे – विंस्टन चर्चिल.
9. यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे – जॉर्ज बर्नार्ड शॉ.
10. जे तुम्ही करू शकता नाही त्याला जे तुम्ही करू शकता याच्यामध्ये येऊ देऊ नका – जॉन आर वुडेन.
11. या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणांपर्यंत घेऊन जाते – ओप्रा विनफ्रे.
12. तुमचं यश यावरून ठरवा की, तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे – दलाई लामा.
13. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं – थॉमस जेफरसन.
14. या जगात यशस्वी होणाचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं – अज्ञात.
15. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे – अज्ञात
16. जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं.
17. गर्वाची गोष्ट कधीही न पडण्याच नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे.
18. एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते.
19. एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्यासाठी खुणावलं पाहिजे.
20. मी हे ओळखलं आहे की, कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे.
Comments
Post a Comment